जिजाऊंच्या संस्कारातून सबल समाजनिर्मिती!

स्त्रीशक्ती, युवाशक्ती आणि संस्कारशक्ती यांची एकत्र वाटचाल — जिजाऊंच्या प्रेरणेतून उभी राहिलेली नवयुगाची चळवळ!

जिजाऊ ब्रिगेड

आमचे प्रमुख उपक्रम

01.

महिला सबलीकरण

प्रत्येक महिलेला आर्थिक, सामाजिक आणि वैचारिकदृष्ट्या सबल बनवण्याचा प्रयत्न.

02.

युवक विकास

नव्या पिढीला नेतृत्व, करिअर आणि राष्ट्रसेवेच्या दिशेने प्रेरित करणे.

03.

सामाजिक कार्य

समाजातील दुर्बल घटकांसाठी मदतीचा हात — आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण.

04.

शिक्षण आणि उद्योजकता

ज्ञान आणि रोजगाराद्वारे प्रगतीचा मार्ग.

About Us

जिजाऊ ब्रिगेड

जिजाऊ ब्रिगेड ही फक्त एक संघटना नाही, तर ती एक विचारप्रवाह आहे — जो प्रत्येक स्त्री, युवक आणि कुटुंबात आत्मविश्वास, संस्कार आणि समाजसेवेची ज्योत पेटवतो. जिजाऊंच्या प्रेरणेवर आधारित ही चळवळ आज राज्यभरात समाजबांधणी आणि राष्ट्रनिर्मितीचे कार्य करत आहे.

संस्कार, संघटन आणि सबलीकरण या त्रिसूत्रीवर उभी असलेली जिजाऊ ब्रिगेड — समाज परिवर्तनाची नवी दिशा.

Our Impact

आमच्या कार्याचा प्रभाव — प्रेरणादायी प्रवास!

जिजाऊंच्या संस्कारातून उभ्या राहिलेल्या हजारो कार्यकर्त्यांची आणि समाजसेवेची ठोस पावले.

जिजाऊ ब्रिगेडने गेल्या काही वर्षांत राज्यभरात हजारो लोकांपर्यंत पोहोचत सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक बदल घडवले आहेत. प्रत्येक सदस्य हा या चळवळीचा जीवंत भाग आहे — जिजाऊंच्या विचारांचे प्रतिबिंब आणि सबलीकरणाचा प्रतीक.

सक्रिय सदस्य
0 +
यशस्वी उपक्रम पूर्ण
0 +
जिल्ह्यांमध्ये शाखा
0 +
स्वयंसेवक प्रशिक्षित
0 +

आपणही या परिवर्तनाच्या प्रवासाचा भाग व्हा.

जिजाऊंच्या विचारांवर आधारित कार्यात सहभागी व्हा आणि सबल समाजनिर्मितीच्या चळवळीत योगदान द्या.

जिजाऊ ब्रिगेड

चंद्रपूर - अधिवेशन

नोव्हेंबर 2025 | 3 दिवसांचा प्रेरणादायी प्रवास

महाराष्ट्रभरातून येणाऱ्या हजारो जिजाऊ ब्रिगेड कार्यकर्त्यांचा, महिलांचा आणि युवांचा एकत्रित उत्सव — “जिजाऊंच्या विचारांचे सजीव दर्शन!” 

या तीन दिवसांच्या अधिवेशनात नेतृत्व विकास, सामाजिक संघटन, आणि संस्कारित समाजनिर्मिती या विषयांवर विविध सत्रांचे आयोजन केले जाणार आहे.

प्रेरणादायी वक्ते, महिलांसाठी खास प्रशिक्षण कार्यशाळा, युवकांसाठी मार्गदर्शन सत्रे, तसेच समाजसेवा प्रकल्पांच्या प्रदर्शनातून “जिजाऊ ब्रिगेड” च्या कार्याची नवी झलक पाहायला मिळेल.

एकत्र येणं, विचार मांडणं आणि पुढील वाटचालीसाठी दिशा ठरवणं — यासाठी हे अधिवेशन ठरेल “एक परिवर्तनाचं व्यासपीठ.”

चालू उपक्रम

जिजाऊ ब्रिगेडच्या विविध उपक्रमांद्वारे समाजाच्या प्रत्येक घटकाला प्रेरणा, मार्गदर्शन आणि प्रगतीची दिशा दिली जाते. हे उपक्रम महिला सबलीकरण, युवक विकास आणि सामाजिक परिवर्तन यांचे जिवंत उदाहरण आहेत.

नारीशक्ती जनजागृती अभियान

– महिलांसाठी नेतृत्व प्रशिक्षण शिबिर
प्रत्येक स्त्रीमध्ये दडलेले नेतृत्व उजागर करण्यासाठी विशेष प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आत्मविकास सत्रे आयोजित केली जातात. या शिबिरांतून महिलांना समाजकार्यात, उद्योजकतेत आणि परिवार व्यवस्थापनात नवसंजीवनी मिळते.

सावित्री जिजाऊ दशरार्तोत्सव

3 जानेवारी ते 12 जानेवारी या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर सावित्री जिजाऊ दशरार्तोत्सव हा उपक्रम राबविल्या जातो. या माध्यमातून दहा दिवसामध्ये सर्व महानायिकांच्या विचाराचा जागर आणि प्रबोधनाचे विविध उपक्रम घेतले जातात. विविध स्पर्धा, सांस्कृतीक कार्यक्रम, आरोग्य शिबीरे असे नानाविध उपक्रम राबविले जातात. मराठा सेवा संघ अंतर्गत जिजाऊ ब्रिगेडच्या या उपक्रमाची दखल शासनाने सुद्धा घेतली आणि काही वर्षांपासून शासकीय कार्यलयात हा उपक्रम सुरु केला आहे.

वाचन संस्कृती

- जिजाऊ वाचन कट्टा
महिलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी जेणेकरून महिलांमध्ये वैचारिक समृद्धता येईल. तसेच महिलांमध्ये वक्ता, लेखक, साहित्यिक निर्माण होईल आणि या अनुषंगाने माहील शिक्षितच नाही तर सुशिक्षित होतील हा या वाचनकट्ट्यामागचा उद्देश आहे

महानायिका पूजन

अंधश्रद्धा आणि कर्मकांडाच्या विळख्यातून बाहेर निघून वैचारिक क्रांती व्हावी यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणजेच महानायिका पूजन, चरित्र वाचन आणि चिंतन

Scroll to Top